पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू झालेली असून आपले नाव मतदार यादीत असो वा नसो, सर्वांना मतदार नोंदणी करायची आहे त्यासाठी खालील महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात.
 
◆ नवीन नोंदणी 1 ऑक्टोबर 2019 ते 6 नोव्हेंबर 2019 दरम्यान होत आहे.

◆ या अगोदर पदवीधर मतदार असलेल्यांनी ही नव्याने पुन्हा नोंदणी करावयाचीच आहे.

नाव नोंदणी अटी:-
◆ 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी कोणत्याही विद्यापीठातुन पदवीधारक अथवा पदवी समकक्ष अर्हता प्राप्त पाहिजे म्हणजे निकाल 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी लागलेला हवा.
     
◆ पदवीधारक कोणाला म्हणायचे- बी.ए, बी. कॉम, बी.एस्सी, बी ई (सिव्हिल,मेकॅनिकल,आय टी,कॉम्प्युटर), बी.ए.एम.एस, बी.डी.एस, बी.सी.एस, बी.बी.ए, बी.सी.ए, 12 नंतर 3 वर्षाचा कोणताही डिप्लोमा, बी.फार्म, बी.लीब इ.पदवीधारक मतदान करू शकतात.

नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया:-
 ◆ फॉर्म नंबर 18 घेऊन त्यामध्ये पासपोर्ट फोटो चिटकवून, स्वतःचे पूर्ण नाव, वडिलांचे पूर्ण नाव, स्वतःचे शिक्षण, जन्म तारीख, व्यवसाय, पत्ता, विधानसभा मतदार संघ, मतदान असलेल्या गावाचा भाग क्रमांक (मतदार केंद्र क्रमांक), मतदार ओळखपत्र (ईपीक) क्रमांक, फोन नंबर, पदवी विद्यापीठ नाव, पदवी प्राप्त वर्ष आदी माहिती भरून* *मागणीदाराची स्वाक्षरी करावी.

◆ फॉर्म सोबत
    स्वतःचा एक पासपोर्ट फोटो
    शिक्षणाचा पुरावा- आपल्या पदवीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र

रहिवासी पुरावा-
मतदार ओळखपत्र/आधार कार्ड/रहिवासी दाखला/लाईटबील

 जन्मतारखेचा पुरावा- आधार कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला/ड्रायव्हिंग लायसन्स/जन्म दाखला
या स्व-साक्षांकित (self attested) प्रतीच जोडव्यात

◆ विवाहित महिलांचे लग्नापूर्वी वडिलांच्या नावाने शिक्षण झालेले असते आणि लग्नानंतर  कागदोपत्री पतीच्या नावाने नोंदी असतात. अशांसाठी महिलांनी मॅरेज* *सर्टिफिकेट(विवाह नोंदणी दाखला) किंवा पॅनकार्ड साक्षांकित प्रत जोडावी

◆ पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.

     त्यामुळे तुमच्यासह तुमच्या परिवारात, शाळेत वा कार्यालयात जे जे पदवीधर आहेत त्या सर्वांची मतदार नोंदणी करण्याची ही संधी दवडू नका.

ही वेळ व संधी वाया घालवू नका ही आग्रहाची विनंती प्रती सहा वर्ष ने आपल्या ला स्नातक म्हणून मतदान करण्याची संधी असते व मतदान आपला अधिकार आहे आजच  आपला मतदान चा  वापर करण्यासाठी आपली नोदणी करा
    फार्म व नोंदणी करिता सपर्क तहसील कार्यालय किंवा खालिल दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा अधिक माहिती व फार्म उपलब्ध आहेत.

आपण जर पदवीधर असाल किंवा आपल्या घरातील कोणी पदवीधर असाल तर मला आपण एक पर्सनल  मँसेज करावा. आपण पदवीधर मतदार संघासाठी मतदार म्हणुन आपण नोंदणी करावी ही अपेक्षा आणि विनंती

वाचा , विचार करा आणि पुढे सर्वाना पाठवा