"वीस वर्ष घाटवळणातुन प्रवास चालुयं आयुष्याचा, "

नकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी "नकुसा" नावं ठेवलं

आज वाघीण भेटली.... कोर्टातुन येत असताना माझ्या पुढे महींद्रा बोलेरो पिकअप होती... मला त्या गाडीला ओव्हरटेक करायचं होतं म्हणुन थोडं पुढे आले.. तेवढ्यात त्या बोलेरो मधुन ड्रायव्हींग सिटच्या बाजुने चक्क हातभर हिरव्या बांगड्यांचा हात बाहेर आलां ...😍😄.... कुतुहलं वाटलं म्हणुन अजुन थोडी पुढे आले ....आणी त्या बोलरोमधे नजर वळवली तर चक्क एक ४०/४५ वर्षांची वाघीण महींद्रा पिकअप हाणत होती.....त्यांना सांगितलं काकु गाडी साईडला घ्या..... मग काय मॅडमनी ट्राफीक मधुन गाडी व्यवस्थीत बाजुला घेतली.... त्या गाडीतून काॅन्फीडन्टली उतरल्या. नाव सांगितलं नकुसा म्हासाळ..

या नकुसा काकु कवठेमंहकाळ तालुक्यातल्या एका खेडेगावातुन आहेत ज्या रोज कोकणात जातात स्वत: ड्राईव्ह करुन रत्नागिरी, लांजा , राजापुर या भागांत चार ते पाच टन भाजी घेऊन जातात तिथल्या बाजारात घालतात आणी हे काम त्या गेली वीस वर्ष करतायतं ....कोकणात ते पण घाटातुन रोजचा हा प्रवास......... कौतुक वाटलं .... आणी त्याही पेक्षा अभिमान जास्त वाटला या वाघिणीचा....कुठलही काम कमी दर्जाच कधीच नसतं आपण ज्या मेहनतीने ते करतो ती मेहनत ...... तो त्या कामाचा दर्जा वाढवतं असतं

आज त्यांच्या गाडीत मागे लोखंडी सळ्या होत्या....म्हंटलं मग हे आज काय आहे गाडीत....तर म्हंटल्या गावाकडे बंगला बांधतीये मी त्याचचं सामान आहे हे घेऊन चाललीये गावाकडे....आमचीच गाडी आहे ही तेव्हा ड्रायव्हर ला पगार देण्यापेक्षा स्वत:च करते मी काम म्हणाल्या.......वीस वर्ष घाटवळणातुन प्रवास चालुयं आयुष्याचा , कष्ट चालुय मग बंगला तो बनेगा ही भाई

नकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी कदाचित नकुसा नावं ठेवलं असावं, पण तीच्यात मला आजची सुपरवुमन दिसली....जिचं शिक्षण फक्त नववी पर्यंत झालंय पण तिचं कर्तृत्व बघुन तिला आरटीओ ॲाफीसर नी मोफत लायसन्स काढुन दिलं.........नकुसा काकु तुमच्या जिद्दीपुढे, तुमच्या कर्तुत्वापुढे , तुमच्या आत्मविश्वासापुढे मी खुप तोकडी वाटले मलाच..

सलाम तुमच्या जिद्दीला आणी घाटवळणाच्या संघंर्षाला .

साभार : ॲड दिपा चौंदीकर