चिमुरडीचे "पाय " पाळण्यात दिसतात

कु स्वरा श्रीकांत वाघमारे - वय वर्ष २ महिने ४. आपल्या देशातील एक विलक्षण दैवीक देणगी लाभलेली एक इवलीशी चिमुरडी .पण या चिमुरडीची " अफाट बुद्धिमत्ता जर आपण पहिली तर डोळ्याचे पारणे फिटते.
योग्य मार्गदर्शन आणि दैवी शक्ती (GOD GIFT )
कु स्वारा,अवघ्या २ वर्षाची आहे अजून सुद्धा "नीट उभे राहू शकत नाही अगर ती शब्द नीट उच्चरत नाही पण या चिमुरडीने जी १००० हुन जास्त इंग्रजी शब्द चित्रावरून सुंदर ओळखते. ते पाहून या विलक्षण बुद्धीला सलाम करावासा वाटतो आज रोजी तब्बल १००० हुन जास्त चित्रे मग जी अनेक वस्तू ,अनेक प्राणी ,फळे ,गाड्या असतील .अनेक देशांचे राष्टीय ध्वज, लहान गणिते ,तर कधी अनेक राष्ट्रीय महान व्यक्ती ज्यात नेताजी सुभाष चंद्र बोस ,महात्मा गांधी ,गुरुदेव रवींद्र टागोर वीर सावरकर ,दादाभाई नौरोजी, डॉ अब्दुल कलाम सर,नेल्सन मंडेला भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू देखील आहेत .ते ही चिमुरद्दी " नाव उच्चरातच "तात्काळ दाखवते
लहान मुलांवर "कोवळ्या वयात जर योग्य संस्कार जर आई वडील आणि गुरुजनानांनी केले ,तर त्याचे किती सुपीक परिणाम या लहान वयात कोवळ्या वयाच्या मुलांवर बिंबतात याचे हे सुंदर उदा आहे याचा सर्व मित्रमंडळींनी जरूर दखल घ्यावी .आजच्या या सुपर फास्ट युगात आपल्या पाल्यावर ज्या प्रमाणे मोबाईल रुपी काळ राक्षस आज "चिमुरड्या मुलाची बुद्धिमत्ता "विचार करण्याची जी शक्ती आहे ति पोखरत आहे ,त्या वेळी या २ वर्षाच्या चिमुरडूवर त्याच्या आईवडिलानी जे संस्कार आणि ट्रेनींग दिली आहे तो अतिशय आशादायक आहे या प्रयत्नाचा प्रयोग प्रत्येक पालकाने आपली मुलांवर जरूर करावा जेने करून आपली लहान मुले मोबाईलच्या विळख्यातून वाचू शकतील आणि त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यास खूप मदत होईल .
स्वराचे वडील श्री श्रीकांत वाघमारे ( MA BEd) हे पुण्यात राहतात .आई सौ बुद्दिशिला श्रीकांत वाघमारे (BA ) हे प्रशिक्षक आहेत ,यांचे मूळ गाव नांदेडचे रहिवासी आहेत .या ग्रामीण भागातून सुद्धा येऊन या प्रचंड आत्मविश्वास आणि बुद्दीमत्तच्या श्रीकांत सरनी आपली मुलीवर जे संस्कार केले आहते ते प्रशंसनीय आहेत. आज श्रीकांत सर आणि आज बुद्धिमत्ता ट्रेनर ,/माईंड पॉवर ट्रेनर आहेत आणि ते मुलांमध्ये वर ह्या गृहिणी प्रमाणे बुद्धिमत्ता मग जी अगदी चित्रे ओळखण्यापासून ते लहानसहन गणिते पटापट सोडवन्यास मुलांना प्रशिक्षण देतात आणि त्यात अगदी मास्टर करतात ,याचीच ही झलक .या सर्व प्रशिक्षण सुंदर प्रयोग त्याने स्वतः आपल्याच २ वर्षाच्या चिमुरडीवर अगदी यशस्वी केला आणि तो १०१ टक्के सफल झाला.आहे.
स्वराच्या आईवडील खास पुण्याहून ,मुंबईला मला भेटायला आले होते ,त्या भेटीत हा सुंदर प्रवास उलगडला .या सुंदर प्रशिक्षणातून स्वरच्या "प्रखर बुद्धीची झलक पाहायला मिळाली .आपण लहान मुलांवर अगदी कोवळ्या वयात जर त्याच्या बुद्दीला जर योग्य वळण लावून त्याच्ये "प्रशिक्षण दिले तर याचा मुलांना त्याच्या भावी आयुष्यात सुंदर फायदा होते. हे सिद्ध झाले आहे.
स्वराचे वडील श्री श्रीकांत वाघमारे हे उच्चशिक्षित असून ते MPSC स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सुद्धा करतात आणि त्यांना या क्षेत्रात मोठे काम करण्याची जिद्ध आहे .त्यात ते जरूर यशस्वी होतील यात काहीच संदेह नाही.
ज्यांना त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ ज्या मित्रमंडळींना आणि पालकांना घेऊ शकतात,त्याच्या साठी संपर्क क्रमांक देत आहे श्रीमकं वाघमारे सर ८८६२०४५८५१.
मुलांमधील उपजात असलेल्या बुद्दीमत्तेला अशा प्रकारे सुंदर संस्कार देण्याचा या प्रामाणिक प्रयत्नाला सलाम आणि स्वरा आणि तिच्यासारख्य अनेक लहानथोरांना हार्दिक शुभकामना ..
यशवंत व्हा ..गुणवंत व्हा ..


Post a Comment

0 Comments