माऊलीची "मंत्रालयाजवळील झाडाखालील २५ वर्षं जुनी खानावळ


मेहनत,जीद्द,चिकाटी,समर्पण,आत्माविश्वास आणि विश्वास उद्योगिनी
मंत्रालयाकडून विधानभवनाकडे जाताना एका झाडाच्या बुंद्द्याला दुपारच्या वेळी जेवण विकात असलेली माऊली आणि काहीजन तिचे जेवन करत असलेले दिसले. सहज मी त्या उद्योगिनी गप्पा मारत मारत तिचा जीवनप्रवास समजून घेतला... आणि ही व्यक्ती आमच्यासाठी व तरुण -तरुणीसाठी मेहनत, जीद्द , चिकाटी, समर्पण, आत्माविश्वास आणि इतरांचा विश्वास संपदान करणारी प्रेरणादायक माऊली आहे.
मुळची देवगड (कोकण )येथील पोट भरण्यासाठी मुंबईत स्थालांतरीत .
पहिले सहा महिने प्रेमिलाच्या आईने गावाकडून पाठविल्या तांदळाची पेज खाऊन दिवस काढले. या सहा महिण्यात एकदाही तांदळाच्या पेज सोबत भाजी खाण्यास तिला मिळालं नाही म्हणून आता तिच्याकडे जेवण करणाऱ्यास ग्राहकांना जितकी भाजी पाहिजे तितकी भाजी देतांना कधी किंमत करत नाही.
या ठिकाणी १६ जून १९९३ पासून झाडाखाली बसून ... SBI बँक, विधानभवन, मंत्रालय आणि बंदोबस्तावर आसणारे पोलिस आणि काही कामानिमित्य येणारे वहानचालक व इतर जन यांना माफक दरात पण रुचकर जेवण उपलब्ध करुण देण्यात येते आणि इथे जेवणकरणारे हेच तिचे ग्राहक आहेत. मागील २५ वर्षापासून स्वतःचा हा खानावळीचा व्यवसाय करताना अनेक आठवणी तिच्या मनात साठवून आहेत. तिचे मामा पोलिस बिनतारी संदेश वहानावर होते.त्यांनीच प्रेमिला प्रकाश मुळम,- प्रेमिलाला सुरुतीला एक हजार रुपये देवून हा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत केले व तिने त्यात भांडे व सामान घेवून पहिल्या दिवशी 80 पोळ्या , भात आणि भाजी करुण या ठिकाणी विक्रीसाठी आणले.तीचा मामा आसलेल्या पोलिसांनी त्यावेळी रस्त्यावर बंदोबस्तासाठी आसणाऱ्या पोलिसांना तिचे अन्न विकत घेवून खाण्यास विनंती केली व बघता बघता तिचे सर्व अन्न संपले आणि तिच्या हाताच्या चवीमुळे मागील २५ वर्षापासून हा एक व्यक्ती रस्त्यावरील खानावळीचा व्यवसाय उन्हळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या मोसमात उघड्यावच सतत चालू आहे हि तिची जिद्द, चिकाटी आणि मेहनत वाखण्याजोगी आहे.
भायखळा येथील घरात नवरा अर्धांगवायुने पडून आहे तो कधी कधी भाजी कापण्यास मदत करतो तसेच तिचा मुलगा हाही घरीच आसून तोही या कामास घरी मदत करतो पण त्याला नोकरी नाही व त्याचे शिक्षण फक्त नववी आहे याची तिला खंत वाटते. त्यासाठी तिने SBI मध्ये ओळखीने कंत्राटी कर्मचारी म्हणून ठेवल होते परंतू त्याला वर्षाला फक्त दोनशे रुपयेच पगारवाढ झाल्याने मुलाने ती नोकरी सोडली त्याचे या माऊलीने लग्नही करुण दिले. नवरा माझ्यासोबत( जीवंत ) आजपर्यंत आहे याचा लिला अभिमान आसून तिच्या कुटूबांचे ती योग प्रकारे पालनपोषण करू शकते याचा तिला आत्मविश्वास आहे..
ती आवर्जून सांगते की नांदेडचे कांबळे नावाचे आमदार तीचा नवरा दवाखाण्यात ऍडमिट असताना दरमहा दोन हजार रुपये औषधासाठी देत होते आणि त्यांना कार्यक्रमात मिळणारे सर्व नारळ तिला देत असत.
तसेच तिच्या हाताच्या जेवणाची चव चांगली आसल्याने तिच्या ग्राहकांचा तीने विश्वास संपादन केलेला आहे . हे सांगताना आर .आर. पाटील व डावखरे ह्यांनी अनेकदा तिचे जेवण खाल्ले आसल्याच सांगते.. तीच्या हाताला चव आसल्याने अनेकांनी स्वयंपाकिन म्हणून काम करण्याच्या ऑफर दिल्या होत्या पण तिने यात न आडकता स्वतःचा स्वतः व्यवसाय करायाचा ठरवून तिने तिचा व्यवसाय मागील २५ वर्षापासून चालू ठेवला आहे.
तुम्ही कोणाला मदत मागितली का असे विचारले असता तिने सांगीतले की डावखरे साहेबांनी माझे जेवन केले तेंव्हापासून त्यांच्या बंगल्यावरून मला पाणी मिळते ते आजही . नारायण राणे साहेब आमच्या गावाकडचे आसल्याने त्यांना विनंती अर्ज करुन या रस्तावर टपरी ठाकू देण्यासाठी अर्ज केला होता पण त्याचे पुढं काहीही झाले नाही असे त्यांनी सांगितलं..
मागे काही वर्षापूर्वी दिल्लीत बॉम्ब स्पोट झाला होता तेव्हा या विधानभवनासमोर अनेक टपरी चालक होते ते सर्व पोलिसांनी काढून टाकले पण मला पोलीस स्टेशनला नेऊन बसवले व कांही वेळाने सोडून दिले... फक्त आधिवेशन काळात येथे बसू देत नाहीत . त्यासाठी पास मागतेय पण मिळत नाही अशी ती म्हणते..
अशी ही माऊली जिद्दीने, चिकाटीन , मेहनतीन व आत्मविश्वासाने एक व्यक्ती खानवळ मागील २५ वर्षापासून झाडाच्या बुंध्याला बसून चालवत आहे .
तिच्या या जिद्दीला सलाम.

Post a Comment

0 Comments