१६ वर्षांची पर्यावरणप्रेमी चिमुरडी कार्यकर्ती


बालपणातही काही मुले असे कार्य करतात की.....
१६ वर्षांची पर्यावरणप्रेमी चिमुरडी कार्यकर्ती’
स्वीडनमधील ग्रेटाने टूनबर्ग हिला ‘अस्पर्जर सिंड्रोम’ हा आजार असतानाही तिने ‘पर्यावरण संवर्धना’साठी व ‘जागतिक तापमान वाढ रोखण्या’साठी स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलन करून लोकचळवळ उभारली.१६ वर्षाची स्वीडनमध्ये राहणारी ग्रेटा, हिच्यामुळे आज रोजी २० सप्टेंबर जगभरातील तब्बल ५० लाख मुलं हिने सुरू केलेल्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
ती मागच्या वर्षीपासून दर शुक्रवारी शाळा बुडवून स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन एकटी बसू लागली. हातात एक फलक असायचा की जगात 'पर्यावरणीय आणीबाणी' घोषित करा, सुरुवातीला तिच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही, पण हळूहळू ती लोकांच्या नजरेत येऊ लागली, तेथील लोकंही तिच्यासोबत दर शुक्रवारी संसदेसमोर बसू लागले, जगभरात ग्रेटाची चर्चा व्हायला लागली, तिला सगळीकडून पाठिंबा मिळायला लागला, याची दखल घेत इंग्लंडने 'पर्यावरणीय आणीबाणी' घोषित देखील केली, तिच्या या आंदोलनाला २० सप्टेंबरला १ वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून तिच्या आंदोलनाची दखल घेत जगभरात '२० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर' जागतिक हवामान आठवडा म्हणून साजरा केला जात आहे.ग्रेटाच्या आंदोलनाला Fridays For The Future' असे नाव मिळाले असून, हे आंदोलन विविध देशांत पोहोचले आहे. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्येही आंदोलने झाली आहेत. जवळपास १०० देशांत हे आंदोलन होत आहे.


८ वर्षाची असल्यापासून क्लायमेट चेंज(हवामानात होणारा बदल) या विषयावर ऐकत आली होती .लहानपण हे खेळण्या-बागडण्याचे वय. मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करण्याचे दिवस. पण, या बालपणातही काही मुले असे कार्य करतात की, जे मोठ्या व्यक्तींनाही जमत नाही. जगासमोर आज अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. हवामानातील बदल हे त्यापैकीच एक. याबाबत अनेक देशांमध्ये परिषदा होतात, चर्चा होतात, ठरावही मंजूर होतात. नंतर काही देश पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतात, तर काही विरोधात भूमिका घेतात. जागतिक स्तरावरही याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना अमेरिकासारखा मोठा देश यातून काढता पाय घेतो. पण, अशाच या गंभीर विषयाकडे एका युवतीने आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
त्याबद्दल जास्त वाचल्यावर तिच्या लक्षात आलं की, माणूस हा प्राणी निसर्गावर करत असलेल्या आघातामुळे, दररोज किमान २०० वनस्पती आणि कीटकांच्या प्रजाती नामशेष होत आहे, आणि हे असच चालत राहिलं, तर ही मानवजात लवकरच नष्ट होईल...म्हणून तिने सुरू केलेली ही मोहिम आज जगभरात एक चळवळ म्हणून उभी राहत आहे...
ग्रेवाला पाठिंबा देण्यासाठी फक्त मुलांनाच कां रस्त्यावर उतरवायचं? थोरांची काहीच जबाबदारी नाही कां? आजच्या परिस्थितीला मुलांपेक्षा ज्येष्ठ जास्त जबाबदार आहेत. इतकेच नाही, तर जागतिक तापमान वाढीच्या विषयावर ग्रेटाने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
या १६ वर्षाच्या ग्रेट ग्रेटाला ग्रेट सलाम दिलसे.

Post a Comment

0 Comments