गुटका सोडला आणि वाचवलेल्या पैशातून १००० झाडाचे जंगल उभारले


महावीर पांचाल एक उमदा तरुण ,अनेक व्यसनाच्या नादापायी आयुष्यातुन वाया गेला होता.गुटका ,दारू इ व्यसने .रोज किमान ५०-६० रु या गुटख्यावर खर्च करत होता.रोज २५-३० गुटका रिचवत होता .

महावीरचे ऑटो पार्ट चे साधे दुकान होते .राहणार बुंदी ,तालुका -नेनवा  तालुका.हा व्यवसायनिमित्त सतत फिरतीवर असायचा .सतत प्रवास .मग त्याला ह्या गुटखायची गोडी लागली .गोडी कसे ते होते महाभयंकर व्यसन .सतत फिरतीवर असताना त्याच्या एक लक्ष्यात आले की त्याच्या गावात झाडांची संख्या खूप कमी आहेजवळ जवळ नाहीच ..

मग ही झाडे लावायचे कुणी ,जगयायाचे कुणी  ,आणि त्या साठी लागणार पैसे कुठून आणायचा ? गावातले व्यसनमुक्ती केंद्राचे श्री लाडू सेन यानी सोडविला.

रोजचे किती रुपयाचा गुटका खातोस  ?? रोजचा त्या वर किती करतोस  ?????

५० -६० रुपये फक्त ... हो. 


मग त्या पैशातून सुद्धा झाडे लावता येतील , मग महावीरचे ठरले आता गुटका सोडायचा आणि सोडला की हो अगदी कायमचा.

गावातील हनुमान टेकडीवर ,बरीच मोकळी जागा होती .मग ठरले ,इथेच झाडे लावायचे.झाडे लावायचे प्रशिक्षण घेतले .राब राब महावीर राबला ..२०१३ सालापासून हा झाडे  लावतो आहे. अनेक समस्या आल्या .पण हा पठ्या काही डगमगला नाही. गाई ,शेळ्या ,सतत त्रास द्यायाच्या .पण महावीर एक एक झाड पोटाच्या लेकराप्रमाणे जगवत राहिला २०१५ साली या वाटीकेला प्रचंड आग लागली ,होण्याच्या नव्हते झाले .पण आता महावीर डगमगला नाही .परत जिद्धेने उभा राहिला .

आता नवीन काय करायचे  ? पैस कसे उभारायाचे ?  त्याने घराचे डिश बंद केले आणि पैसे वाचवू लागला .रोज एक वेळ जेवण करून पेसा वाचवला .अनेक फळ झाडे लावली ,पक्षी येऊ लागले.लोक वाटिका पाहायला येत असत .मग लोक हळूहळू मदत करू लागले ,झाडाची रोपे देऊ लागले .
फेसबुक वरून आता लोक मदत करू लागले ,झाडाची रोपे देत असत , आणि अशा प्रकारे  "फेसबुक वाटिका जन्माला आली ,

आज १००० पेक्षा जास्त झाडे .या वाटिकेत आहेत , सर्व सुखाने या वाटिकेत नांदत आहेत.आणि हे सर्व काही "महावीरने गुटका न खाता वाचविलेल्या पैशातून ......

काय मग ..काय विचार आहे ...
जरूर  कळवा .

Post a Comment

0 Comments