कष्टाचंच खाईन पण भीक मागणार नाही

डोळ्यांना अंधुक दिसतंय..पण भीक मागणार नाही ....कष्टाचंच खाईन,

लाचारीने नाही याला म्हणतात स्वाभिमानी जगणं

यांना "आत्म "समाधानाने जगू द्या..

लोकल ट्रेन मध्ये कल्याण,डोंबिवली दरम्यान या बाबांना बऱ्याचदा पाहतो.खांद्याला अडकवलेली कापडी पिशवी, हातातील प्लास्टिकच्या पिशवीत गोळ्या,लाची व "....गले की सफाई",असं बसलेल्या आवाजात यथाशक्ती ओरडत प्रवाशांच लक्ष वेधून घेऊन गोळ्या विकण्याचं काम हे बाबा या वयात करतायत हे पाहून वाईट वाटतं.

त्यांच्याशी थोडं बोलल्यावर त्यांनी सांगितलं, सोमनाथ कपूर त्यांचं नाव.आज त्यांचं वय ९१ वर्षांच आहे,शरीर साथ देत नाहीय, डोळ्यांना अंधुक दिसतंय,पण भीक मागणार नाही,मरेपर्यंत कष्टाचंच कमवून खाईन,हा त्यांचा निर्धार आहे. पण एखादं भला माणूस मला पाच दहा रुपये देऊ करतो, हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं मी त्यांना त्या बदल्यात गोळ्या देतो,कधी ते घेतात,कधी एखादं दुसरीच गोळी, लाची घेतात....कधी नाही घेत.अस घडत कधीतरी अस ही कपूर बाबांनी सांगितलं.

आज हजारो वृद्ध आज एकाकी आयुष्य जगत आहेत.त्यात कितीजणांना सोमनाथ कपूर यांच्यासारखा स्वाभिमानीपणा जपता येत असेल ? कधी ..ते आजारी पडत असतील तर त्यांची मायेने विचारपूस करणार कोणी नाही, बोलायला,फिरायला ऐकायला कुणी नाही.अशा एकाकी जगणाऱ्या वृद्धांच्या मनात काय विचार येत असतील...

मी पाच रुपयांच्या गोळ्या घेतल्या.बॅगेत ठेवल्या .आता ऑफिसमध्ये बॅग उघडली त्या गोळ्या दिसल्या व या ओळी मनात दाटल्या.कधीतरी ट्रेन मध्ये तुमची अशा सोमनाथ बाबांबरोबर भेट झालीच तर त्यांच्याकडून दोन/चार रुपयांच्या कांही गोळ्या जरूर विकत घ्या.बघा तुम्हाला लाख रुपयांच समाधान लाभेल.यांच्यासारखा स्वाभिमानीपणा कितीजणांना जपता येत असेल ? प्रचंड स्वाभिमान जो हल्ली लोप पावत चालला आहे..

असे बरेसच वृद्ध माता पिता आपल्या अवती भोवाती वावरत असतील. कधी बसथांबा ,रेल्वचे डाब्यात, समाजात सतत अवती असतील .तर त्यांना काही मदत आपल्याला जर करता येत नसेल तर किमान  कधीही दुःखवू नका .त्यांना आत्मसमाधानाने जगू द्या .त्याच्या कडील गोळ्या -बिस्किटे शकय असले तर विकत घेऊन त्यांना आत्मसमाधानाने जगू द्या त्यांचा स्वाभिमान जपा .जमत असेल तितकी मदत आवश्य करा.सिगारेच्या  एक पाकिटाच्या धुरात आनंद शोधण्यापेक्षा  २-५ रुपयाची अशी मदत आपण जरूर करू शकतो .

वृध्दांचे दु:ख आणी समस्या वृध्दच जाणोत. तरुणांना त्याची काय जाणीव होणार ? देव त्यांना निरोगी आयुष्य देवो.

Post a Comment

0 Comments