MA. B.Ed शिक्षण घेतलेल्या ७२ वर्षीय सुपर आजी

७२ वर्षीय सुपर आजी ..शिक्षण फक्त  MA. BEd 

आणि जीवन सुंदर अनोखं करण्याची जिद्द..

सुपरआजीचा आदर्श प्रत्येक नवंयुवतींनी घ्यावा..

रेखा जोगळेकर अस या सुपरआजीच नाव असून समाजात सुपर आदर्श घडवत आजीबाईने M.A. B. ed. पर्यंतच शिक्षण केलेल आहे. अगोदर पासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषद ला तब्बल 30 वर्ष केंद्र प्रमुख म्हणून काम सुद्धा या सुपर आजीने केलं आहे. त्यामुळे संसाराचा गाढा यशस्वीरित्या ओढून झाल्यानंतर आपल्या निवृत्ती नंतर काहीतरी अनोखं करण्याची जिद्द घेऊन ह्या सुपरआजी गेल्या 3 वर्षापासून हा त्यांचा भारत भ्रमंतीचा प्रवास सुरु केला आहे.

अगदी 70 व्या वर्षी ठणठणीत दिसणाऱ्या सुपरआजीचा आदर्श प्रत्येक नवंयुवतींनी घ्यावा अस या सुपरआजीला वाटते, आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीला निर्धार 70 व्या वर्षी केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे.आता पर्यंत या सुपरआजीने माहूरगड, तसेच वैष्णव देवी पर्यंतचा तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवासी मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवी च्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकल ने पूर्ण करणार आहे. हि सुपर आजी केवळ आपले परिधान करावयाचे कपडे आणि काही उनपावसापासून सुरक्षेचे साहित्य घेऊन भारत भ्रमंतीला निघाली आहे. वाटेत मिळेल तिथे मिळेल ते खाऊन आजी आपला हा प्रवास करणार आहे.

ह्या वयात काहीतरी हटके करून दाखवण्याची प्रेरणा आजीबाईंना त्यांच्या आई कडून मिळाली असल्याचं आजीबाई सांगतात.नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत,ते सध्या यवतमाळ येथे mseb मध्ये ठेकेदारी करतात.

अगदी पावसाळ्याचा सुरवातीला हा भारत भ्रमंतीला प्रवास सुरु होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करत असतात, व रात्री एखादी मौक्याची जागा पाहत विश्रांती घेतात, प्रत्येक गावात या सुपर आजीचं स्वागत केल्या जातं, ठिकठिकाणी या सुपर आजीला मदतही मिळत असते, त्यामुळे तब्बल २००० किलोमीटर चा हा सायकल प्रवास आजीबाईंना आनंददायी असाच वाटतो...

प्रवासाला निघत असताना सकाळ पासूनच आजीबाईचे घरात पूजन करण्यात आले व आजीबाईंना निरोप देण्यासाठी वाजंत्री सोबत वाजतगाजत गावातून पुष्पहार घालून स्वागत करत आजीबाईंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, आजीबाईचा हा खडतर प्रवास त्यांना सुखाचा जाओ अशी प्रार्थना करण्यात आली. 

सुपरआजीचा आदर्श प्रत्येक नवंयुवतींनी घ्यावा

संतोष द पाटील

Post a Comment

0 Comments