डॉ गणेश राख यांच्या बेटी बचाओ जनआंदोलनाचे नवव्या वर्षात पदार्पण

3 जानेवारी 2012 ला बेटी बचाओ जनांदोलनाची सुरुवात एका कुली/हमाल(porter) चा मुलगा डॉ. गणेश राख यांनी त्यांच्या पुण्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मुलगी झाल्यास प्रसूती मोफत आणि मुलीच्या जन्माचे हॉस्पिटलमध्ये केक कापून , मिठाई वाटून स्वागत करणे या कार्यक्रमाची घोषणा केली. बेटी बचाओ जनांदोलनाचा हा सुरुवातीचा कार्यक्रम होता. आता या कार्यक्रमा बरोबरच चळवळीत मुलींसाठी अनेक योजना सुरू झाल्या आहेत. 
      नऊ वर्षांपूर्वी मुली नकोच ही मानसिकता भारतीय समाजामध्ये शिगेला पोहोचली होती.एक तर लोक मुलींना जन्म देण्यास तयार नसत.मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करण्याचे प्रमाण खूप वाढले होते. यातून काही मुलींचा जन्म झाल्यास अनेक वेळा त्या नवजात मुलींना हॉस्पिटलमधून घरी न नेता, मधेच रस्त्यात आड बाजूला ओसाड ठिकाणी कचरा कुंडीत फेकून दिले जात असे. नंतर त्या फेकून दिलेल्या नवजात मुलींना कुत्री, डुकरे, इतर प्राणी खात असत.
      मुलगी नको ह्या मानसिकतेला छेद देण्यासाठी या विरुद्ध लढा देण्यासाठी समाजाच्या मुलींच्या बाबतीत नकारात्मक मानसिकतेत परिवर्तन करण्यासाठी बेटी बचाओ जनांदोलनाची सुरुवात 3 जानेवारी 2012  ला करण्यात आली. बघता बघता हे आंदोलन आता भारतापूरते मर्यादित न राहता देश विदेशात पसरून आजच्या काळात एक जागतिक आंदोलन झाले आहे. 
      नऊ वर्षात बेटी बचाओ जनांदोलनाला काही प्रमाणात यश निश्चित मिळाले आहे.
1)  या आंदोलनात आजपर्यंत देश विदेशातील 2 लाख पेक्षा जास्त खाजगी डॉक्टर्स,13 हजार सामाजिक संस्था,20 लाखहून अधिक  स्वयंसेवक कार्यरत असुन आपापल्या परिने योगदान देत आहेत.
2) जगभरातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान अजमेर दर्गा बेटी बचाओ जनांदोलनात सहभागी झाला आहे. अजमेर दर्ग्याच्या वतीने मुलींना वाचवण्यासाठी मुलींच्या बाबतीत समाजाच्या मानसिकतेत बदल घडविण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. 
        हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती ( 1142 - 1236 AD ) चे 26 वे वंशज हाजी सय्यद सलमान चिस्ती साहेब यांची रविवार 24जून 2019रोजी भेट झाली.
       सलमान चिस्ती साहेबांनी  आव्हान केल्यानंतर जगभरातील अनेक मशिदीत इमाम शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळेस मुलगी वाचवण्याचा संदेश देऊ लागले आहे 
अजमेर दर्ग्याबरोबरच हिंदू आणि इतर धर्मातील अनेक प्रसिध्द धार्मिक तिर्थ स्थळे, धार्मिक संप्रदाय या आंदोलनात सहभागी झाले आहेत होत आहेत. 
3) डॉक्टरांबरोबरच इतर व्यवसायातील लोक जसे फार्मासिस्ट, पॅथॉलॉगिकल लॅब, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, पेंटर, वकील, शिक्षक, रिक्षावाले, सोनार, वृत्तपत्रवाले, टायर पंक्चर वाले इ. अनेक व्यावसायिक मुलींसाठी सवलती देऊ लागले आहेत. 
4) हे आंदोलन भरतापूरतेच मर्यादित न राहता बांग्लादेश, नेपाळ, पाकीस्तान, चीन, अरब राष्ट्र, तुर्कमिनी स्थान तसेच झाम्बीया, टांझानिया, कांगोसुदान,मालावी यासारख्या अनेक आफ्रिकन देशात त्याचबरोबर कॅनेेडा, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या विकसित राष्ट्रातही पसरले आहे.
5) नऊ वर्षापुर्वी बेटी बचाव जनआंदोलन सुरू करताना शासनाला लोकांना याविषयीचे एवढे महत्व वाटत नव्हते पण हे आंदोलन सुरू झाल्यानंतर केंद्रशासनाबरोबरच जवळजवळ सर्वच शासनांनी बेटी बचाव चे कार्यक्रम सुरू केले आहे.आणि तेही बेटी बचाव चा नारा देऊ लागले आहे.
6) भारतातील आणि जगभरातील प्रतिष्ठित संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, भारतातील स्त्री भ्रूण हत्या (femal foeticides) /मुलींच्या हत्या (femal Infanticide) यांच्या बाबतीत होणारा भेदभाव मुलींवरचे अत्याचार याबद्दल रिसर्च करू लागले आहेत.
उदारणार्थ-
    भारतीय आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या 10 वर्षात भारतात 6 कोटी तीस लाख मुलींच्या गर्भात हत्या झाल्या आहेत. तर भारतात 2 कोटी 10 लाख मुली नकोशा आहेत.
        लॅनसेट मेडिकल जर्नल 2018 च्या रिपोर्टनुसार भारतात गेल्या दहा वर्षांत 0-5 वयोगटातील 24 लाख मुली आहेत म्हणून त्यांना वैद्यकीय उपचार नाकारून हत्या करण्यात आल्या आहेत. यासर्व मुली वाचवता आल्या असत्या पण पालकांना त्या वाचव्यात म्हणून इच्छा नव्हती, म्हणून वाचल्या नाहीत.
 या सर्व रिसर्च रिपोर्ट नंतर एकच गोष्ट लक्षात येते की भारतातील स्त्री भ्रूण हत्या (female foeticides/ female infanticides) हे जगातील सर्वात मोठे मानवी हत्या कांड (human genocides) आहे.
7) बेटी बचाव जनआंदोलनाच्या भारतात आणि भारताबाहेर एक हजार पेक्षा अधिक रॅल्या (rallies/ march) हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. 
8) स्वतःच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 1786 मुली झाल्या म्हणून मोफत डिलिव्हरी करण्यात आल्या आहेत.
9) अमिताभ बच्चन , शाहरुख खान, सोनाक्षी सिन्हा, सुशील कुमार, यांसारखे जागतिक कलावंत खेळाडू या चळवळीत सहभागी झाले आहेत. 
      भारतातील दिवसेंदिवस घटती मुलींची संख्या त्यामुळे निर्माण झालेला सामाजिक असमतोल त्यामुळे मुलींवरती -महिलांवरती वाढत जाणारे अत्याचार बलात्कार , गँगरेप, त्यातून निर्माण होणारे मुलींसाठी व महिलांसाठी असुरक्षित वातावरण यामुळे पालकांकडून वाढत जाणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या / मुलींच्या हत्या या दृष्ट चक्रव्यूह (Viscus Circle) बद्दल भारताबरोबरच जगभरातील शासन, मिडिया  , अंतरराष्ट्रीय संघटना या ठिकाणी चर्चा होऊ लागली. ते सुद्धा यामधून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधू लागले आहेत. प्रयत्न करू लागले आहेत.
     यावरून एक गोष्ट निश्चित जाणवते की नऊ वर्षांपूर्वी ज्याची वैद्यकीय क्षेत्रातील इतर डॉक्टर्स आणि समाज एक वेडा (mad) डॉक्टर म्हणून टिंगल टवाळी करत, त्याच्यामुळे मुलींना वाचवण्यासाठी एक जगव्यापी चळवळ निर्माण झाली आहे.
           या चळवळीमुळे खरेच मुली वाचू लागल्या आहेत का?
     मुलींची संख्या वाढू लागली आहे का?
      या चळवळीला यश मिळाले आहे का?
की अजून खूप प्रयत्न करावे लागतील....
    या सर्व प्रश्नांची उत्तरे आपापल्या भारतीय लोकसंख्या जनगणनेच्या 2021 रिपोर्ट मध्ये (INDIAN CENSUS REPORT 2021) मिळतील. 
पण आज तरी सर्वाना निश्चित वाटू लागले आहे की देश वाचवायचा असेल, जग वाचवायचे समाज वाचवायचा असेल तर मुलगी ही वाचली पाहिजे, तिलाही मुलांप्रमाणे प्रेम ,सन्मान आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे.

- डॉ शिवदीप उंद्रे
( समन्वयक, बेटी बचाओ जनआंदोलन)

Post a Comment

0 Comments