भारतीय कॉर्पोरेट विश्वातील आदर आणि संस्कृतीचं सुखद दर्शन

एकमेकांचे पक्के "प्रतिस्पर्धी असून सुद्धा  परस्पर आदर आणि संस्कृतीचं दर्शन
हे सुखाचित्र फक्त आणि फक्त आपल्या भारतात दिसू शकते ..

भारतीय कॉर्पोरेट विश्वातील आदर आणि संस्कृतीचं सुखद  दर्शन
या कॉर्पोरेट विश्वातील अनेक अनेक युद्धे आपण पाहतो. जागतिक व्यापार आणि जीवघेणी स्पर्धा .मग ती स्वतःच्या  अस्तित्वासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड करायला ,उदयोगना भाग पटते .पण तरी सुद्धा आपल्या देशात अजून सुद्धा काही मोजकेच उद्योग आहेत की जे आपली नैतिकता टिकऊन आहेत
कॉर्पोरेट विश्वातील दोघेही महामेरू. दोघांचा आतापर्यंतचा संघर्षही तितकाच रोमांचक आणि दोघेही आपल्या उद्योगात शिर्षस्थानी. रतन टाटा आणि नारायण मूर्ती ही भारतीय उद्योग जगतातील दोन मोठी नावं आहेत. नारायण मूर्ती आणि रतन टाटा यांच्यात वयाचं जास्त अंतर नाही. नारायण मूर्ती यांच्यात फक्त दहा वर्षाचं अंतर आहे .अनेक तरुण या दोन दिग्गजांना आपला आदर्श मानतात. आपल्या कामगिरीने त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. इतकं यश मिळूनही आजही दोघे आपला साधा सरळ स्वभाव आणि साध्या राहणीसाठी ओळखले जातात.

अशाच एका मंचावर कॉर्पोरेटमधील दोन दिग्गज एकत्र आले आणि दोघांमधील भावनिक नाते जगाला दिसून आले. निमित्त होते टायकॉन अवार्ड सोहळ्याचे. या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्याहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मूर्ती यांनी टाटा यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले. हा क्षण भारतीय कॉर्पोरेट विश्वातील परस्पर आदर आणि संस्कृतीचं दर्शन घडवून गेला.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'टायकॉन २०२०' परिषदेत मंगळावरी संध्याकाळी उद्योजकांना पुरस्कार देण्यात आले. इतकं यश मिळूनही आजही दोघे आपला साधा सरळ स्वभाव आणि साध्या राहणीसाठी ओळखले जातात. अनेकदा याची प्रतिचीही मिळत असते. 

हे सुखाचित्र फक्त आणि फक्त आपल्या भारतात दिसू शकते ..

Post a Comment

0 Comments