आदिवासी आश्रमशाळा सुरू करणारा एक प्रखर सामाजिक भान जपणारा क्रांतिकारी युवक

मतीन भोसले - सरकारी नोकरी सोडून फासेपारधी मुलांसाठी 'प्रश्नचिन्ह' आदिवासी आश्रमशाळा सुरू करणारा एक प्रखर सामाजिक भान जपणारा क्रांतिकारी युवक.आपल्या ध्येयापासून तसूभरही विचलित न होता आपली लढाई पुढे रेटणारा जिगरबाज गडी. 
  आज मतीनने साडेचारशेंहून अधिक मुलांच्या पालन - पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मजुरी करणाऱ्या आई-वडिलांसोबत पुण्या-मुंबईत गेलेली, रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी कित्येक मुलं मतीनने महाराष्ट्रभरातून गोळा करून आणली. १८० विद्यार्थ्यांना एक तर आई - वडील नाहीत किंवा ते जेलमध्ये आहेत. सुरूवातीला 'भीक मागो आंदोलन' करून ह्या मुलांना पोसलं. 'मतीन मुलांची तस्करी करतो', असा आरोपही झाला. अनेकदा त्याला तुरुंगातही टाकल्या गेलं. पण तो डगमगला नाही. 
     'प्रश्नचिन्ह'बद्दल महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्रांनी भरभरून छापलेलं आहे. 'चला, हवा येऊ द्या' मधूनही दखल घेतल्या गेली. जालन्याचा 'मैत्र मांदियाळी' हा गृप भरभरून मदत  करतोय.दर महिन्याचा किराणा ते पाठवतात.चार खोल्याही त्यांनी बांधून दिल्यात. त्यामुळे कशीबशी राहण्याची व्यवस्था झाली. मात्र ही मुले अजूनही कुडाच्या वर्गात शिकत आहेत. प्रकाशजी आमटे यांनी स्वतःचं वाहन मतीनला देऊन टाकलं. अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. पैसा,वस्तू,ज्ञानदान ... असे कुठल्याही स्वरूपात आपणही सहकार्य करू शकता. मतीनचा मोबाईल नंबर इथे देतोय - 9096364529

मुनव्वर राणांचा एक सुंदर शेर आठवला - 

कमसे कम बच्चोंके होठोंकी हँसीकी खातिर 
ऐसी मिट्टीमें मिलाना की खिलौना हो जाऊँ !!

Post a Comment

0 Comments