इतका मोठा माणूस , कोणता गर्व नाही..इतका विनम्र. 

सह्याद्रीच्या प्रेमात पडलेला बेल्जीयन अवलिया - पीटर व्हॅन गेट "


आजच्या शिवजंयतीला हिच खरी शिववंदना ..   

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना आदर्श मानून श्री. पीटर गेट ह्यांनी  सह्याद्री व महाराजांचे २०० किल्ले, गड व दुर्ग ह्यांनी पूर्ण केले. माणसामध्ये जी ऊर्जा, जी शक्ती बघायला मिळाली ती फारच प्रेरणादायी होती. 

पीटर सर.परदेशात सिस्को कंपनीत मोठ्या पदावर असल्याने कंपनीने यांना भारतात नवीन इंजिनिअर भरतीसाठी पाठवले होते.आपल्या देशाने त्यांना इतकी भुरळ पाडली की त्यांनी नोकरी भारतातच मिळावी अशी कंपनीला विनंती केली व ती मान्य झाली.भटकंतीची अत्यंत आवड ऑफिसमधील लोकांनाही ते भटकंतीस नेत. आपल्या देशाच्या ते जणू प्रेमातच पडले होते. सर सह्याद्रीच्या डोंगररांगा पिंजून काढतात कोणी जोडीदार नाहीये की सोबतीला सुरक्षिततेसाठी काही सामान नाहीये.जणू भिती आणि यांच काहीच घेण देण नाहीये. कमीत कमी सामान घेऊन ते भटकंती करतात. त्यांच्या बॅग मध्ये एका माणसासाठीचा एक अगदी छोटा तंबू, स्लीपिंग मॅट व एक स्लीपिंग बॅग असते. डोक्यात टोपी,अंगावर एक टीशर्ट,छोटी पॅन्ट,सॉक्स व शूज. GPS साठी व मोजके फोटो काढण्यासाठी एक मोबाईल फोन (OnePlus7pro) इतकेच सामान, याव्यतिरिक्त काहीही नाही...'ट्रान्स सह्याद्री' ह्या त्यांच्या मोहिमेत कमीत कमी वेळात २०० किल्ले सर करण्याचा त्यांचा मानस आहे.

मागच्या दोन महिन्यांपासून ते सह्याद्रीत फिरतायत महाराष्ट्रातील इतर किल्ले सर केल्यानंतर सातारा , सांगली , कोल्हापूर भाग त्यांनी सध्या निवडला आहे. महाशय एका दिवसात चार ते पाच किल्ले करतात,डोंगरात अथवा पायथ्याच्या गावात जागा मिळेल तेथे आपला तंबू लावतात. त्यांच्या वेगाने व क्षमतेने डोंगर-किल्ले चढणारा ट्रेकर आजवर पाहिलेला नाही..गावातील लोकांनी प्रेमाने दिलेला पाहुणचार स्वीकारून झोपतात,भटकंतीच्या वेळी अन्न, जेवण यांना ते दुय्यम स्थान देतात दिवसभर एकदा पिलेल्या पाण्यावर डोंगरावर चित्त्याच्या वेगात चढण्यात पीटरसरांची हातोटी आहे.जो किल्ला ३० मिनिटे लागतात पायऱ्या चढायला त्यांनी १० ते १५ मिनिटात गडावर चढतात 

इतका मोठा माणूस , कोणता गर्व नाही..इतका नम्र..!! मनाचं मोठेपण नाही. फक्त भारताचा इतिहास ,सह्याद्री आणि शिवाजी महाराजांबद्दल जाऊन घेण्याची फार उत्सुकता...पीटर सरांचं आवडत वाक्य " DIE WITH MEMORIES NOT DREAMS " आठवणींसह मरा स्वप्नां बरोबर नाही. ह्यांच्या ह्या कार्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील युवा वर्ग पुढे येऊन गड कोट किल्यांचे संवर्धन व हा वारसा जपण्यासाठी पुढे सरसावतील हीच जगदंबा आणि आई भवानी च्या चरणी प्रार्थना करतो.

या परदेशी मावळ्याला त्यांच्या पुढील भ्रमंतीस खुप खुप शुभेच्छा..!

आजच्या शिवजंयतीला हिच खरी शिववंदना .